अमरावती, 28 जून 2025:
आज दि. 28 जून रोजी उत्तर झोन क्रमांक 1 रामपुरी कॅम्प अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 06 – विलास नगर मोरबाग परिसरात सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या मार्गदर्शनात आणि उपस्थितीत इतवारा बाजार व भाजी बाजार परिसरात प्लास्टिक पन्नीविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत बाजारात अनेक दुकानदारांकडे प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. यापैकी अंदाजे 2 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, संबंधित दुकानदारांना नोटीस देऊन कडक सूचना देण्यात आल्या की, पुढे प्रतिबंधित प्लास्टिक वापरत आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
यावेळी सर्व दुकानदारांना डस्टबीनचा वापर अनिवार्य असल्याचे निर्देशही देण्यात आले. जप्त केलेले प्लास्टिक झोन कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
सदर मोहिमेत मा. सहायक आयुक्त श्री. तिखिले यांच्यासोबत स्वास्थ्य निरीक्षक विकी जैदे, सैय्यद, सचिन सैनी, तसेच बिट पियून मयूर व अविनाश हे कर्मचारी उपस्थित होते.
महानगरपालिकेने शहरातील प्लास्टिकमुक्त अभियान अधिक तीव्र केले असून, नागरिक आणि व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा