अमरावती शहर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेने हादरलं आहे. शहरात एका पोलीस कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गुन्हेगार बेधडक, पोलिसच असुरक्षित, मग सामान्य जनतेचं काय?
काही महिन्यांपूर्वी नव्याने आलेले पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी मोठ्या गोष्टी केल्या होत्या. “अमरावतीला क्राईममुक्त करू,” असं ते ठामपणे म्हणाले होते. पण आज स्थिती पाहता, त्यांच्या आश्वासनांचं काय झालं?
![]() |
Policeman murdered in Amravati! — Criminals go free, public unsafe! |
- शहरात अवैध धंदे उघड्यावर सुरू आहेत
- गलीगलीत चालू आहेत जुगारांचे अड्डे,
- दारूची बेकायदेशीर विक्री,
- आणि गुन्हेगारांची गुंडगिरी तर इतकी वाढली आहे की, सामान्य माणूस रात्रीचं घराबाहेर पडायलाही घाबरतो.
- घरफोड्या, जबरी चोरी, मारहाणीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चाललेत.
- पोलिस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचाच जीव गेल्यावर, मग सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय?
➡️ जनतेचा प्रश्न एकच आहे –
अमरावतीत कायदा-सुव्यवस्थेचा गाडा रुळावर आहे का? की गुन्हेगारांनाच मोकळं रान दिलं जातंय?
आता वेळ आहे कठोर पावले उचलण्याची.
ACN न्यूज मागणी करतो की, पोलीस प्रशासनाने तात्काळ कडक कारवाई करावी, गुन्हेगारीवर नख लावावं, आणि नागरिकांना दिलासा द्यावा.
📢 हा आवाज आहे अमरावतीकरांचा — भीतीमुक्त आणि सुरक्षित शहराची मागणी करणारा!
हरीश मोहन राठी मुख्य संपादक
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा