अमरावती (दि. २८ जून) – शहरातील स्वच्छता उपक्रमांतर्गत आज स्वीपिंग मशीनच्या साहाय्याने विविध मुख्य रस्त्यांवरील डिव्हायडर आणि दुभाजकांची स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत भारतीय महाविद्यालय राजापेठ, समर्थ हायस्कूल, रिम्स हॉस्पिटल, नवाथे चौक, सातूर्णा, तापडिया मॉल, आणि गोपाल नगर चौक पर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील डिव्हायडरची यंत्राद्वारे सफाई करण्यात आली.
तसेच वेलकम चौक पासून विभागीय आयुक्त कार्यालय, कॅम्प सर्किट हाऊस आणि चपराशी पुरा मशीद पर्यंतचा रस्ता स्वीपिंग मशीनने झाडून कचरा हटवण्यात आला.
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून, अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा नियमितपणे राबवण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा