अमरावती, 28 जून:
झोन क्रमांक 3 दस्तूर नगर व झोन क्रमांक 4 बडनेरा परिसरातील निळे खोके धारक गटई व्यावसायिकांना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसनुसार येणाऱ्या 30 जून 2025 रोजी सोमवार, सकाळी 11:30 वाजेपासून अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.
झोन 3 अंतर्गत दस्तूर नगर परिसरात आणि झोन 4 मधील बडनेरा परिसरात सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करून उभारण्यात आलेले निळ्या रंगाचे गटई खोके हे वाहतुकीस व नागरिकांच्या दैनंदिन हालचालींस अडथळा ठरत असल्याने ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधित गटईधारकांना यापूर्वी नोटीसा दिल्या असून, निर्धारित वेळेपूर्वी स्वखुशीने खोके हटवावेत, अन्यथा महापालिकेच्या यंत्रणेमार्फत ते हटविण्यात येतील, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा