अमरावती : वडाळीलगत असलेल्या बांबू गार्डनमध्ये बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेस्क्यूसाठी पथकाने परिसर पिंजून काढला असताना तो कोठेच आढळला नाही. मात्र निसर्गप्रेमी, पर्यटकांना ये-जा करताना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या.
अमरावतीलगतच्या जंगल क्षेत्रात बिबट्यांची संख्या वाढत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. चार दिवसांपूर्वी एसआरपीएफ कार्यालयात बिबट्या जिना चढून आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
त्यामुळे अमरावती शहराच्या पूर्वेकडील भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात संचार आहे. अशातच बांबू गार्डनमध्ये पर्यटक, निसर्ग सहलीसाठी ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक असते. चक्क बांबू गार्डनमध्ये आढळल्याने कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्येही वातावरण पसरले व्हिडीओत हा बिबट्या पायाने अपंग असल्याचे दिसून येत आहे
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा