अमरावती : अमरावतीकरांनो, कचरा हा कचरा पेटीतच टाका. शहरात सार्वजनिक ठिकाणी, पुलावरून कचऱ्याने भरलेल्या पिशव्या भिरकावल्या तर तुम्हाला दंड झालाच म्हणून समजा, असा सज्जड इशारा महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी दिल्या आहे. अस्वच्छतेचे चित्र आता बदलण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा महानगरपालिकेने उगारला आहे. त्यामुळे शहरात वाटेल तिथे कचरा टाकाल तर दंड केला जाईल, असा इशारा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी दिला आहे
पुलावरून, रस्त्याचा एखादा कोपरा पाहून, धार्मिक स्थळाचा परिसर, भाजी मंडई, उद्यान, बसथांबा किंवा कोणत्याही स्वरूपाचे सार्वजनिक ठिकाण दिसताच कचऱ्याने भरलेल्या पिशव्या रिकाम्या केल्या जातात. काही जण तर कचऱ्याच्या पिशव्या हवेतून भिरकावून देतात. या सगळ्यांवर त्याच वेळी दंडात्मक कारवाई करण्याचा पवित्रा आता प्रशासनाने घेतला आहे.आयुक्त सौम्या शर्मा यांनी शहरातही स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आता सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. काही बेजबाबदार नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता केली जाते. तरीही अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई अधिक कडक केली आहे. प्रत्येक नागरिकाने आपले शहर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. काही नागरिकांमुळे शहरात अस्वच्छता निर्माण होत असेल, तर त्यांनीही आपल्या सवयींमध्ये बदल केला पाहिजे, असे महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी सांगितले आहे. याअनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी हमालपुरा रोडवरील तीन कचरा स्पॉट साफ करण्याची कार्यवाही केली
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा