अमरावती , 2 : अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील घरकुल योजनेला चांगलाच वेग आला आहे. वाळू वितरणाची प्रक्रिया वेगात सुरू झाल्याने घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांनी पालकमंत्री महोदयांचे आभार मानले आहेत.
![]() |
Under the initiative of Guardian Minister Chandrashekhar Bawankule, the Gharkul scheme in the district gains momentum |
महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाळू वितरणाची प्रक्रिया वेगात सुरू असून, 30 जून 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील 54 हजार 949 मंजूर घरकुलांपैकी 7 हजार 148 लाभार्थ्यांना वाळूचा पुरवठा करण्यात आला आहे.
घरकुलांसाठी एकूण 2 लक्ष 15 हजार 14 ब्रास वाळूची मागणी आहे. जिल्ह्यामध्ये स्थानिक वापरासाठी 165 वाळू गट राखीव ठेवण्यात आले असून, त्यातून 54 हजार 918 ब्रास वाळूसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, एकही वाळू गट अद्याप लिलावात गेलेला नाही, त्यामुळे हा संपूर्ण साठा घरकुल लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. आतापर्यंत 8 हजार 870 ब्रास वाळूचे वितरण करण्यात आले आहे.
तालुकानिहाय वाळू वाटपाचा तपशील (लाभार्थी संख्या आणि वाटप झालेली वाळू ब्रासमध्ये) अमरावती-15 लाभार्थी, 75 ब्रास, तिवसा- 31, लाभार्थी, 121 ब्रास, भातकुली- 279 लाभार्थी, 287 ब्रास, चांदूर रेल्वे- 245 लाभार्थी, 307 ब्रास, नांदगाव खंडेश्वर- 399 लाभार्थी, 430 ब्रास, धामणगाव रेल्वे- 203 लाभार्थी, 236 ब्रास, मोर्शी- 434 लाभार्थी, 434 ब्रास, वरुड- 479 लाभार्थी, 490 ब्रास, दर्यापूर- 265 लाभार्थी, 628 ब्रास, अंजनगावसुर्जी- 350 लाभार्थी, 350 ब्रास, अचलपूर- 2 हजार 731 लाभार्थी, 2 हजार 991 ब्रास, चांदूरबाजार-217 लाभार्थी, 1 हजार 21 ब्रास, धारणी- 1 हजार 500 लाभार्थी, 1 हजार 500 ब्रास, चिखलदरा-0 लाभार्थी, 0 ब्रास.
Under the initiative of Guardian Minister Chandrashekhar Bawankule, the Gharkul scheme in the district gains momentum
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा