आयोवा : भारताचे प्रतिभावान खेळाडू तन्वी शर्मा आणि आयुष शेट्टी यांनी यूएस खुल्या बॅडमिंटन सुपर ३०० स्पर्धेतील उपांत्य फेरीत गाठली. तन्वीने अग्रमानांकित मलेशियाच्या करुपाथेवन लेत्शानाला ३३ मिनिटांत २१.१३, - २१.१६ असे पराभूत केले, तर आयुषने कनिष्ठ जागतिक चॅम्पियन तैवानच्या कुओ कुआन लिनवर २२.२०, २१.९ असा विजय मिळवला. पुरुष दुहेरीत, हरिहरन अमसाकारुनन आणि रुबान कुमार आर यांना तैवानच्या चियांग चिएन आणि वेई वू सुआन यी यांनी २१.९, २१.१९ असे नमवले. उपांत्यपूर्व फेरीत तन्वीचा सामना युक्रेनच्या पोलिना बुहारोवाशी होईल, तर आयुष अग्रमानांकित तैवानचा चाऊ तिएन चेनशी भिडेल.
- Blogger Comment
- Facebook Comment
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा